Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगजबजलेला पवननगर भाजीबाजार सील

गजबजलेला पवननगर भाजीबाजार सील

नवीन नाशिक | प्रतिनिधी

करोना च्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात लॉक डाऊन असताना नवीन नाशिक मध्ये पवननगर येथील भाजी बाजार गजबजलेला असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या समन्वयाने येथील भाजी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

नवीन नाशिक लगतच असलेल्या मनोहर नगर परिसरात करणाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर तीन किलोमीटरचा संपूर्ण परीसर सील करण्यात आला.

मोठ्या गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील भाजीबाजार सर्वप्रथम बंद करण्यात आला. दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असत प्रशासनाच्या या निर्णयामुळे सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाची प्रशंसा केली.

मनोहर नगरपासून तीन किलोमीटरच्या आत असलेला पाटील नगर उद्यान शेजारील भाजीबाजार देखील असाच बंद करण्यात आला. मात्र सुरक्षित अंतर ठेवा हा नियम धाब्यावर बसवित हजारोंच्या संख्येने गर्दी होत असलेला पवन नगर येथील जिजामाता भाजी मार्केट अद्यापही सुरू होते.

या ठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्याकरीता पोलीस व मनपा प्रशासनाच्या वतीने भाजी विक्री त्यांनी सोबत चर्चा करून गर्दी टाळण्याकरिता उपायोजना करणेबाबत ‘ सुरक्षित अंतर ठेवत ‘ बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी ,अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी वाहतूक शाखा वपोनी सुभाष पवार, सपोनि संजय बेडवाल यांचेसह मनपा नवीन नाशिक विभागीय अधिकारी एस जी शिंदे उपस्थित होते.

यावेळी भाजी विक्रेत्यांनी भाजी मार्केट बंद ठेवत नवीन नाशिक व परिसरात इतरत्र भाजी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘ सुरक्षित अंतर ठेवा ‘ या नियमाचे पालन करत भाजी विक्री करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या