पाथरवटलेन तोडफोड प्रकरणी वाल्मिकनगरमधून हत्यारे जप्त

0

पंचवटी (प्रतिनिधी) ता. १७

पंचवटीतील पाथरवट लेन आणि गजानन चौकात १५ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास हत्यारे घेतलेल्या टोळ्याने धडगूस घातला.

या हल्ल्यात टोळक्याने अनेक वाहनांसह घराची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली.

त्यानंतर आज वाघाडी परिसरातील वाल्मिकनगर येथे पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन राबविले.

त्यात एका घराच्या छतावर घातक हत्यारे मिळून आली आहेत.

पोलिसांनी हत्यारे जप्त केली असून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

संबंधित बातमी

टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

LEAVE A REPLY

*