Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचा पंचवटीशी संपर्क तुटणार; एकमेव होळकर पूल सुरु

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शनिवारपासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे गंगापूर धरणातून ३५ हजार ९९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. होळकर पुलाखाली पाण्याचा विसर्ग मिनिटाला ५८ हजार ८७० क्युसेक एवढा प्रचंड आहे.

गोदेने रौद्ररूप धारण केले असून नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले आहे. काल रामसेतू पूल पाण्याखाली गेल्यानंतर रामवाडी पूल, चोपडा पूल, संत गाडगे महारार पूल, वाघाडी पूल, टाळकुटेश्वर पूल यासह लहान मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नाशिकचा पंचवटीशी असणारा संपर्क जवळपास तुटला आहे.

होळकर पूल एकमेव सुरु असला तरी पाण्याची पातळी ज्या वेगाने वाढते आहे हे बघता खबरदारीचा उपाय बघता या पुलावरून वाहतूकदेखील बंद करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर होळकर पुलालादेखील शक्यता नाकारता येत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!