Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी साप शोधणाऱ्या सर्पमित्रांचा गौरव

Share

नाशिक | प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पिंपळगाव येथे जाहीर सभा होती. भाजपकडून या सभेसाठी झोपूळ रोडवरील मार्केट यार्डची जागा निश्चिती करण्यात आली होती. दरम्यान, याठिकाणी साप निघाल्याने सर्वत्र याबाबत उलट-सुलट बातम्या पसरल्या होत्या. यादरम्यान, सर्पमित्रांनी याठिकाणी चोख कामगिरी बजावत आपले कर्तव्य पार पाडले. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्पमित्रांच्या कर्तव्यनिष्ठ कामाची पावती म्हणून २५ सर्पमित्रांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने आज प्रशिस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनादेखील गौरविण्यात आले. निमित्त होते जिल्हा पोलीस दलाच्या मासिक गुन्हे परिषदेचे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस आणि सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला.

सत्कारार्थीमध्ये नक्षलग्रस्त भागात चोख सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सपोनि हेमंत बेंडाळे, पोउनि स्वप्निल नाईक, पोउनि विलास घिसाडी, पोउनि अजय कवडे, पोउनि जयसिंग राजपुत, पोउनि गोपाळ लावणे, पोउनि अमोल पवार असे एकुण 08 पोलीस अधिका-यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या १६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याप्रसंगी गौरविण्यात आले. जिल्हयातील नांदगाव तालुक्यात न्यायडोंगरी परिसरात एकाच रात्री झालेल्या 09 घरफोडया करणारे  सराईत गुन्हेगारांना शिताफिने ताब्यात घेवुन सुमारे 04 लाख 10 रूपयांची मालमत्ता हस्तगत करणारे नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचाही गौरव करण्यात आला.

तसेच मालेगाव शहरातील कुख्यात गुन्हेगार माजीद हुसेन वाजीद हुसेन उर्फ मज्ज्या दादा याच्या खुनाच्या गुन्हयाचा अत्यंत अभ्यासपूर्ण तपास करून 07 संशयितांना अटक करून उल्लेखनीय तपास करणारे पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकास गौरविण्यात आले.

यासोबतच पिंपळगाव बसवंत येथे 22 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात सभास्थळावरील मंडप उभारणी केली जात असतांना मोकळया भुखंडावर बरेच साप आढळुन आले होते.

त्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते. या सर्पमित्रांनी विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून कर्तव्य पार पाडले होते. त्यांचाही गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक शर्मिश्ठा वालावलकर, सहा.पोलीस अधीक्षक आर.रागसुधा, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय एस.व्ही.जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा अशोक करपे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा एन.आर.गायकवाड,  सपोनि जनार्दन सोनवणे यांचेसह जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!