Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

ऑनलाईन गेम्स आणि सट्टा 

Share

देशदूत डिजिटल विशेष

जगात अनेक प्रकारचे लोक असतात, पण जवळपास सर्वांच्याच मूलभूत गरजांमध्ये पैसे आणि इंटरनेट ह्यादेखील मूलभूत गरजा झाल्या आहेत. कमीत कमी कष्टात आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, याकडे अनेक जणांचा कल असतो. झटपट पैसे मिळवण्यासाठी अनेकजण सट्टा खेळतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर सट्ट्याचे प्रकार बदलले. आजकाल सट्टा देखील ऑनलाईन खेळला जात आहे. सट्टा पूर्णपणे बेकादेशीर आहे, आणि त्यासाठी मोठा दंड आणि शिक्षा होऊ शकते असे माहिती असतानाही अनेकजण शीघ्रश्रीमंतीच्या नादात बळी पडतात.

ऑनलाईन गेम्स

ऑनलाईन गेम्स तर अनेक आहेत. पण ज्या गेम्स वर पैसे लावले जातात अशा गेम्सचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दोन प्रकार आहेत. काही गेम्स असे आहेत की, ज्यामुळे अशा आहेत ज्यात गेम खेळतानाच पैसे लावले जातात. ते पैसे खेळणाराही लावतो आणि बघणारेही लावतात.

काही वेळा गेममध्ये पैसे लावणे वगैरे अशी काही सोय नसते. पण, त्या गेमचा वापर करून बाहेर पैसे लावले जातात. गेम खेळताना त्यात काही रक्कम भरून जिंकल्यास मोठी रक्कम परत मिळेल आणि ती त्वरित बँक अकाउंट मध्ये भरली जाईल, असेही काही गेम्सकडून सांगितले जाते. काही वेळा छोट्या रक्कमेसाठी हे खरं होतही असेल. पण त्यात धोका आहेच.

ऑनलाईन सट्टा

पूर्वीपासून सट्टा हा प्रकार तेजीत आहे. देशात सट्टा खेळणे गुन्हा आहे. परंतु, आता सट्टा ऑनलाईन देखील आपले पाळेमुळे पसरवू लागला आहे.

क्रिकेट मॅच असो किंवा निवडणूक किंवा एखादा रिऍलिटी शो, प्रत्येकावर सट्टा लावला जातो. यासाठी अनेक वेबसाईट्स आणि ऍप्प राजरोसपणे भारतात सुरु आहेत.

त्यांचा वापर अगदी सहज केला जाऊ शकतो. यामध्ये वापरल्या जाणार्‍या काही वेबसाईट्स या खूप प्रसिद्ध आहेत. सट्टा लावण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.

लॉगिन करून पुढे सट्टा लावता येतो. त्यासाठी काही वेबसाईट्सवर आपले बँक तपशील द्यावे लागतात. तर काही वेबसाईट वर बिटकॉइनच्या माध्यमातून सट्ट्याची देवाणघेवाण करतात. सट्टा लावण्यासाठी दलाल किंवा मध्यस्थ ऑनलाईन सुद्धा आहेतच.

त्यांच्या ओळखीशिवाय किंवा मान्यता मिळाल्याशिवाय काही प्रमुख बेटिंग वेबसाईट्स वर नोंदणी करता येत नाही. ’बेईमानीका धंदा इमानदारिसे’ हे वाक्य काही प्रमाणात इथे लागू होत नाही. अनेकदा यात ही फसवणूक होतेच.

ऑनलाईन गेम किंवा सट्टा यामध्ये कशी फसवणूक केली जाऊ शकते?

रम्मी, ऑनलाईन ल्युडो असे अनेक गेम्स आहेत ज्यात पैसे लावले जातात. काही वेळा बँक तपशील देताना ते हॅक होण्याची भीती असते. पण सध्या काही महिन्यांपासून एक नवीन पद्धत ऑनलाईन गेम्स बाबतीत सुरु झाली आहे. स्वतःच गेम्स बनवायच्या आणि सॉफ्टवेअर च्या मदतीने त्यात हवे तसे बदल करत राहायचे.

उदा. ल्युडो खेळताना सुरुवातीला छोट्या रक्कमेसाठी खेळाडूला मुद्दाम जिंकावले जाते. त्यासाठी सॉफ्टवेअरच्या मदतीने सलग 6, 6 पाडले जातात आणि थोडीफार रक्कम जिंकल्याबद्दल दिली जाते. यामुळे वापरकर्त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. तो जेव्हा मोठी रक्कम लावतो तेव्हा काही केल्या जिंकत नाही. कारण सॉफ्टवेअर मध्ये 1, 2 पेक्षा जास्त फासे फाडू नये अशी सूचना केली जाते.

ऑनलाईन गेममध्ये करता येतात तांत्रिक बदल?

ऑनलाईन खेळल्या जाणार्‍या गेम्स वर आज काळ लोकांचा खूप विश्वास बसू लागला आहे. याच विश्वासाचा फायदा अनेक हॅकर्सकडून घेतला जातो. ल्युडो आणि रम्मी चे काही गेम्स खूप प्रसिद्ध आहेत, आणि त्या अधिकृत गेम मध्ये काही धोका नाही. पण काही हॅकर्स कडून त्या अधिकृत गेम मध्ये तांत्रिक कोडिंग चे बदल करून फसवणूक केली जाते.

म्हणजेच हॅकर ला हवे तसेच फासे पडतात, किंवा जेव्हा गेम मध्ये पैसे भरण्याची वेळ येते तेंव्हा बँक तपशील चोरले जातात. याच गोष्टी ऑनलाईन सट्टा लावताना हि घडू शकतात.

ऑनलाईन लॉटरी

जो प्रकार ऑनलाईन गेमच्या बाबतीत घडवला जातो, तोच काहीवेळा ऑनलाईन लॉटरी बाबतही घडतो. अनेक प्रसिद्ध ऑनलाईन लॉटरी आहेत, तसेच काही छोट्या मोठ्या वेबसाईट्स वर ऑनलाईन लॉटरीची सोया केलेली असते. यातही सुरुवातीला छोटी रक्कम मुद्दाम जिंकू दिली जाते, आणि मोठ्या रक्कमेच्या वेळी सॉफ्टवेअरमध्ये हवे तसे बदल केले जातात.

सामान्य लोकांना मात्र याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे ’सगळं ऑनलाईन आहे, आपल्या हातात काही नाही’ असे सांगून त्यावर पडदा टाकला जातो.

ऑनलाईन सट्टा, ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन गेम्स यात खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार चालतात. तेवढीच मोठी फसवणूकही होते. कधी कुठे कोणता आकडा दाखवायचा किंवा काय निर्णय दाखवायचा त्यासाठी कसे कुठे बदल करायचे. हे त्या त्या गेम्स किंवा ऍप्प तयार करणार्‍यांना बरोबर माहित असते.

ऑनलाईन गेम्स वापरताना कोणती काळजी घ्यावी?

ल्युडो, रम्मी सारखे कोणत्याही ऑनलाईन खेळात आर्थिक व्यवहार करू नयेत. डाउनलोड करताना गेम अधिकृत आहे का नाही याची खात्री करावी. एक सारख्या दिसणार्‍या अनेक गेम आहेत. काही गेम्स मधून आपल्या मोबाईलवर मालवेअर चा हॉल होण्याचीही भीती असते. ऑनलाईन लॉटरी बाबतीही तसेच आहे. ऑनलाईन लॉटरीच्या अनेक फेक वेबसाईट्स आणि ऍप्प आहेत. त्यापासून दूर राहणे योग्य ठरेल.

इंटरनेट वर अनेक वेबसाईट्स आणि ऍप्प असले तरी भारतात सट्टा पूर्णपणे बेकादेशीर आहे. पकडले गेल्यास मोठा दंड आणि शिक्षा होऊ शकते. तसेच सट्टा किंवा त्या सदृश्य गेम्स मध्ये काही फसवणूक झाल्यास कोणीही पोलिसात तक्रार करत नाही.

कारण स्वतः वरही कारवाई होण्याची भीती असते. परंतु अशी काही फसवणूक झाल्यास सायबर पोलिसात तक्रार करावी, काही प्रमाणात त्रास होईल परंतु मूळ गुन्हेगार पकड्ण्यासही मदत होईल. सायबर विश्वात सावध राहणे फार गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक किंवा मानसिक नुकसान झालेच म्हणून समजा.

– ओंकार गंधे (सायबर तज्ञ आणि विश्लेषक)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!