Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव : कांद्याला या हंगामातील सर्वाधिक ५ हजार ३६९ रुपये दर

Share
लासलगाव | हारूण शेख
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शनिवारी या हंगामात सर्वात निच्चांकी कांदा आवक झाली. कांद्याची आवक घटल्यामुळे कांदयाची आज सर्वाधिक 5 हजार 369 रुपये प्रतीक्विंटल दराने विक्री झाली.
यंदाच्या हंगामातील 19 सप्टेंबरची 5 हजार 100 रूपये भाव त्यानंतर आजची सर्वाधिक उच्चांकी दर कांद्याला आज लासलगाव बाजारसमितीत मिळाला. कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दर वाढला आहे.
घाऊक बाजारात कांद्याचा दर पन्नास रुपये प्रतीकिलोपेक्षा अधिक पोहोचल्यामुळे  किरकोळ बाजारात यामध्ये २० ते ३० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच बाजारात कांदा विकत घ्यायचा असेल तर तो किमत ७० ते ८० रुपयांनी घ्यावा लागणार आहे.
लासलगावी आज सकाळच्या सत्रात 21 वाहनातील 237 क्विंटल कांदा  किमान 1891 ते कमाल 5369 दराने विक्री झाला. यात सरासरी 4901 रुपये भाव राहिला.
काल (दि. 01) रोजी कांदा आवक 2492 क्विंटल झाली होती. यामध्ये कांद्याला किमान 2100 ते कमाल 4801 व सरासरी 4551रूपये दर मिळाला. गुरूवारी कांदा आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत 580 रूपयांची कमाल भावात तेजी झाली होती.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!