Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिन्नर तालुक्यातील एक रूग्ण पॉझिटीव्ह; मालेगाव तालुक्यातील ‘ती’ अफवाच

सिन्नर तालुक्यातील एक रूग्ण पॉझिटीव्ह; मालेगाव तालुक्यातील ‘ती’ अफवाच

नाशिक/सिन्नर | प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील कठडा येथील डॉ. झाकीर रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाची कोरोना बाधित चाचणी सिद्ध झाली आहे. त्यांमुळे नाशिकमध्ये चार रुग्ण झाले असून वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरूं आहेत. जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे, त्याची तिसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या रुग्णाला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.

- Advertisement -

आज सकाळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण सिन्नर तालुक्यातील असल्याचे समजते. हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सिन्नर तालुक्यातील कोणत्या गावातील हा रुग्ण आहे हे अद्याप समजले नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेने सिन्नर तालुक्यातील हा रुग्ण कुठून आला होता.

कुणाकुणाच्या संपर्कात तो आला. याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबियांना स्थानबद्ध केले जाणार आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बारा होत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून चाचण्या करून घ्याव्यात. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नयेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाचे वय साधारण 65 वर्षे आहे. चाचणी सिद्ध झालेल्या रुग्णासह काही नातेवाईक मालेगाव येथे जाऊन आल्याचे समजते. यातील त्याच्या तीन कुटुंबीयांवर गुन्हा दाखल असल्याचे समजते आहे.

मालेगावमधील ती अफवाच 

सिन्नर येथील रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती सोशल मीडियात पसरत असतानाच मालेगावमधील आणखी १२ रुग्ण नव्याने कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती सोशल मीडियात पसरवली जात होती. मात्र, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्वरित स्पष्टीकरण देत मालेगावमध्ये कुठलेही रुग्ण आढळून आले नसून केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या