Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवला : कांदे भरताना ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू

Share
येवला : कांदे भरताना ट्रॉली अंगावरून गेल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू, nashik news one dies in an accident at yeola apmc

येवला | वार्ताहर

मार्केटमध्ये लिलावादरम्यान जमिनीवर टाकण्यात आलेले कांदे ट्रॉलीमध्ये भारत असताना एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत ही घटना घडली.

येथील बाजार समितीच्या आवारात कांदयांचा लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरत असताना अचानक चालकाने ट्रॅक्टर मागे घेतले असता या घटनेत अनिस पठाण (रा. कौठखेडे) यांचा डोक्यावरून ट्रॉली गेल्याने जागीच मृत्यू झाला.

बाजार समितीतील शेतकऱ्यांनी तत्काळ या व्यक्तीला दवाखान्यात दाखल केले मात्र तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेतील ट्रॅक्टर हा तालुक्यातील कोळम येथील असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!