वीज वितरणचा गलथान कारभार; विद्युतवाहक तारा शेतात पडल्याने महिलेचा मृत्यू

0

देवळाली कॅम्प | वार्ताहर

शेवगेदारणा येथे वीजवाहक तार शेतात पडलेली असताना या तारेचा शॉक बसून महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव हौसाबाई सुरेश कासार असल्याचे समजते.

वीज वितरण कंपनीची विद्युत वाहक तार गव्हाच्या शेतात पडली होती. तारेतून विद्युत प्रवाह खंडित झालेला नव्हता. याचवेळी हौसाबाई शेतातून जात होत्या.

त्यांचा पाय तारेवर पडल्यानंतर त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच महिलेला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*