जि.प.उपाध्यक्षांकडून कार्यकारी अभियंत्याची झाडाझडती

0

नाशिक । दि. 23 प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागात प्रलंबत कामाच्या चौकशी, पाठपुरावा करण्यासाठी येणार्‍या अभ्यागतांना कार्यकारी अभियंत्यांकडून अरेरावी आणि उद्धट भाषा वापरली जात असल्याची तक्रार, जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे गेल्यांनी उपाध्यक्षांनी कार्यकारी अभियंत्यांची झाडाझडती घेतली. तसेच अभ्यागतांशी नीट वागण्याची तंबी देली.

जिल्हा परिषदेत ल.पा. पश्चिम विभागात कामाची माहिती घेण्यासाठी आलेल्या एका अभ्यागताला या विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे यांनी उद्धटभाषा वापरून थेट कार्यालयाच्या बाहेर काढून दिले. वारंवार एकाच कामाचा पाठपुरावा करू नका, परवानगी घेतल्याशिवाय कार्यालयात येत जावू नका, असे कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित अभ्यागताला म्हटले.

त्यामूळे त्या व्यक्तीने थेट जि.प.उपाध्यक्षा नयना गावित यांच्या कक्षाकडे धाव घेतली. तेथे ल.पा पश्चिम कार्यालयात झालेल्या प्रकाराचे कथन उपाध्यक्षांकडे केले. वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी उपाध्यक्षा गावित यांनी ल.पा. पश्चिमचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांना आपल्या कक्षात बोलून घेतले. काय प्रकार झाला, याची माहिती गावित यांनी वाघमारे यांच्याकडे मागितली असता, त्यांनी संबंधित व्यक्ती तीनदा-तीनदा एकाच कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयात येते, त्यांना सांगितले की वारंवार पाठपुरावा करू नका.

त्यावर उपाध्यक्षा गावित यांनी म्हटले की, जिल्हा परिषद ही शासनाच्या योजनांच्या कामाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, त्यामूळे येथे कोणीही कितीही वेळा आला तरी अधिकार्‍यांनी संयमितपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्या अभ्यागत्यांचे शंकासमाधान होईपर्यत उत्तरे दिली पाहिजे.

त्यावर कार्यकारी अभियंता यांनी म्हटले की, कोणीही उटसुट आपल्या कार्यालयात आलेले मला पटत नाही, असे म्हणून उपाध्यक्षांच्या कक्षात बसलेल्या त्या संबंधित व्यक्तीला पुन्हा उपाध्यक्षांसमोरच बोलण्यास सुरवात केली.

यावर उपाध्यक्षा गावित यांनी मध्यस्थी करताना म्हटले की, तुम्ही अधिकारी असूनही लोकप्रतिनिधी समोर आणि तेही जिल्हा परिषद उपाध्यक्षांसमोर जनतेला असे बोलता तेव्हा तुम्हाला कार्यालयीन शिस्त आहे का, असा सवाल वाघमारे यांना केला.

त्यावेळी वाघमारे यांनी म्हटले की, असे कसे मी कार्यकारी अभियंता असून कोणीही उठसुट आपल्याकडे आलेले चालणार नाही, असे म्हणून जोरात बोलण्यास सुरवात केली. यावेळी उपाध्यक्षा गावित यांनी कार्यकारी अभियंता वाघमारे यांना धारेवर धरत तुम्ही उपाध्यक्षांसमोर अशा पद्धतीने बोलता तेव्हा इतरवेळी लोकांना कसे उत्तर देत असाल याचा अंदाज आला. तुमच्या कामकाजातील वागण्यात सुधारणा करा, असे म्हणत जि.प. उपाध्यक्षांनी वाघमारे यांना धारेवर धरले.

LEAVE A REPLY

*