पावसामुळे त्र्यंबकचे धबधबे खळालले; भातशेतीला जीवदान

0

त्र्यंबकेश्वर, (वार्ताहर) ता. २८ : गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत.

त्र्यंबकेश्वरला पाणी पुरवठा करणारे अहिल्या धरण निम्मे भरले असून येथील धुके आणि धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

मॉन्सून सक्रीय झाल्याने पश्चिम पट्ट्यातील भातशेतीला मोठा फायदा होणार आहे. मागील आठवड्यात लागवड केलेल्या भातरोपांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

*