त्र्यंबकेश्वरला पैसेवाल्यांना निवारा; सामान्य भाविकांना पाऊस-वारा

0

त्र्यंबकेश्वर । देवयानी ढोन्नर
त्र्यंबकेश्वर मंदिरात रोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनास येतात आणि लाखो रुपयांनी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थाची देणगी पेटी भरत असते.

देणगी दर्शन 200 रु. या मुख्यप्रवेश द्वारापासून ते मुख्य मंदिरापर्यंत असलेल्या प्रवेश रांगेत भाविकांसाठी उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये संरक्षण व्हावे म्हणून पत्र्याचे शेड लावण्यात आले आहे.

मात्र विनामलल्य दर्शनाच्या भल्यामोठ्या प्रवेश रांगेत भाविकांसाठी ऊन लागू नये म्हणून कापडाचा पेंडाल टाकलेला दिसून येतो.अचानक येणार्‍या वळवाचा पाऊस यामध्ये भाविकाचे स्नान घडते सर्वसाधारण रांगेतून दर्शनासाठी येणारा भाविक उन्हाळा पावसाळा निवार्‍याच्या प्रतीक्षेत राहिला आहे.

विनामूल्य दर्शनासाठी गैरसोयीची ही रांग
पासधारकांसाठी निवाऱ्याची ही रांग

पुरातत्त्व खाते परवानगी देत नाही असे कारण पुढे करत पूर्व दरवाजाचा दर्शनबारीचा आराखडा गत काही वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे वारंवार ऐकवण्यात येते. तथापी परस्परांवर सतत शाब्दिक शरसंधान करत असलेले विश्वस्त मंडळ या बाबत मात्र उदासीन असल्याचे निदशर्र्नास आले आहे.

मंदिर प्रांगणात प्रवेश केल्यानंतर भाविक कसाबसा मंदिरात दर्शनासाठी जातो. मात्र दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर दक्षिण दरवाज्याने गायत्री मंदिराच्या बाजूस जाताना त्याला ऊन-पावसाचा मारा सहन करत बाहेर पडावे लागते. विशेष म्हणजे याकडे अद्यापपर्यंत कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

10 जून रोजी प्रफुल्ल गाडगे नामक भाविक दर्शनासाठी येथे आले असता त्यांना मंदिरात छत्री नेण्यास प्रतिबंध करण्यात आला. म्हणून त्यांनी सोशल मिडियाद्वारे ट्वीट करून आपल्या भावनांना वाट करून दिली तेव्हा या विषयावर चर्चा घडत राहिली.

या बाबत सुरक्षा रक्षकाकडून माहिती घेतली असता त्यांनी मात्र अशाप्रकारे छत्रीसाठी अडवले जात नाही असे सांगितले आहे.अर्थात जेथे फुल,नारळ,पूजा साहित्याला बंदी आहे.तेथे आम्ही छत्रीसारखी वस्तू थेट मंदिरात नेऊ देतो असे म्हणणे तर्कसंगत वाटत नाही एकूणच या प्रकाराने भाविकांची विविध प्रकारे होणारी हेळसांड आहे.

रुग्णांना देणगी दर्शनरांगेतून थेट प्रवेश
अशाप्रकारे छत्री आत नेऊ न देणे असा कोणताही निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतलेला नाही.सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा यंत्रणा मोबाईल फोन,बॅग इत्यादी बाहेर ठेवण्यास सांगतात. तसेच अपंग, वयोवृद्ध भाविकांना देणगी दर्शनाच्या रांगेतून थेट दर्शन दिले जाते. त्यांच्याकडून कोणतीही देणगी दर्शन पावती घेतली जात नाही. पूर्व दरवाज्यास पावसाळ्याच्या दृष्टीने वॉटरप्रूफ मंडप उभारण्यासाठी कार्यवाही सुरु झाली आहे. मंदिर प्रांगणात पुरातत्त्व खात्याच्या परवानगी शिवाय कोणतेही काम करणे शक्य नाही.
– सत्यप्रिय शुल्क, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त

रुग्णांसाठी व्यवस्था नाही
2 तास झाले मला या रांगेत उभे राहून मी पेशंट असल्याने मला आता उभ राहणे शक्य नाही म्हणून मी रांगेतून बाहेर आलो.येथे रूग्णांसाठी ट्रस्टने वेगळी प्रवेशरांग करावी. तसेच या प्रवेश रांगेत ऊन लागू नये म्हणून जे कवर टाकलेले आहे तेही ठिकठिकाणी फाटलेले आहे. आणि याच घडीला जर पाऊस आला तर सर्वच लोक भिजतील येथे कोणतीही सुविधा व्यवस्थित नाही.
-जितेंद्र कुमार (जमशेदपूर ) ( पूर्व प्रवेशद्वार प्रवेश रांगेत उभे असलेले )

 

LEAVE A REPLY

*