त्र्यंबकेश्वर मंदिर सोमवारी रात्री १ पर्यंत सुरू राहणार

0

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) ता. ५ : सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी खग्रास चंद्रगहण आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर रात्री १ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.

ग्रहणानिमित्त मंदिरात रात्री विशेष पूजा होणार आहे. तशी जुनी परंपरा आहे. देवस्थानचे अधिकारी राजाभाऊ जोशी यांनी या माहितीला दुजोरा दिला.

दरम्यान तिसऱ्या श्रावण सोमवारी ५ ते ६ लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला आणि फेरीला येणार हे गृहित धरून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

LEAVE A REPLY

*