Video : तपोवन एक्सप्रेसमधील थरार; जागेच्या वादावरून दोघांनी बाहेर काढल्या तलवारी

0

मनमाड (प्रतिनिधी) : नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आज तलवारींचा थरार अनुभवला. जागेच्या वादातून जागेच्या वादातून दोन प्रवाशांनी हातात तलवार घेवून इतर प्रवाशांना मारझोड केली. ही घटना व्हिडिओत कैद झाली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली.

औरंगाबाद-मनमाड दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडी मनमाडला पोहचताच आरपीएफ, रेल्वे पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जसपालसिंग, (रा. वार्ड नं.  १०, मोटरजा, जारकखेडा, खेरीबासी, परळाना, कालेरा पंजाब ) आणि हरजितसिंग, (रा.  कोरळा, भिनवाफ मनुपूर कलोरगट,) अशी त्यांनी नावे आहेत.

( व्हिडिओ : बब्बू शेख, देशदूत, मनमाड)

LEAVE A REPLY

*