शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

0

नाशिक । दि. 25 प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ यांनी दिली.

नाशिक विभाग नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जून 2018 मध्ये होणार आहे. त्यादृष्टीने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जारी केला आहे.

1 नोव्हेंबर 2017 पूर्वी सहा वर्षे म्हणजे 31 ऑक्टोबर 2011 पूर्वीचे किमान तीन वर्षांहून अधिक सेवा दिलेले माध्यमिक शिक्षक हे अर्ज भरू शकतात. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त मतदार नोंदणी अधिकारी तर नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत.

निवडणुकीचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांचे असले तरी नाशिक जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे काम जिल्हा निवडणूक शाखेकडून होणार आहे. मागील वेळी जिल्ह्यातून 14 ते 15 हजार मतदार होते.

यावेळी त्यात आणखी भर पडू शकते. शिक्षक मतदारांना निवडणूक शाखेकडून विहित नमुन्यात अर्ज देण्यात येतील. त्यात मतदारांचे नाव, छायाचित्र, पूर्ण पत्ता, वय, संपर्क क्रमांक, नोकरी करत असलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव, नोकरीचा कालावधी आदी माहितीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*