दिव्यांगाना दाखले वाटपासाठी मनपातर्फे शिबीर

0

नाशिक, दि.26, प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका वैद्यकिय विभागातर्फे 8 ते 24 ऑगस्ट दरम्यान घरोघरी जाऊन दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात साधारण 7 हजार 500 दिव्यांग व्यक्ती आढळल आहेत.

या दिव्यांग व्यक्तींमध्ये काही जणांकडे सिव्हील सर्जन यांनी प्रदान केलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र होते व अन्य सदर प्रमाणपत्र नव्हते. ज्या अपंग बंधु-भगिनींकडे अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र आहे व ज्यांचे दिव्यांगत्व 40 टक्कयांपेक्षा जास्त आहे अशा सर्व बंधु-भगिनींना मा.शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांच्या दिव्यांगात्वाचा लाभ दयावयाचा आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे विभागनिहाय शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे शिबीर नाशिक महानगरपालिकेच्या विविध दवाखान्यांमध्ये घेतले जाणार आहे. त्यात नाशिक पुर्व व पश्चिम विभागातील दिव्यांगासाठी डॉ झाकीर हुसेन रूग्णालयात 27 सप्टेंबर रोजी, नविन नाशिकसाठी मायको प्रसुतीगृहात 28 सप्टेंबरला, पंचवटी विभागासाठी इंदिरा गांधी रूग्णालयात 29 सप्टेंबर रोजी, तर नाशिकरोड विभागासाठी उपनगर प्रसुतीगृहात 29 सप्टेंबर रोजी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

या शिबीरात येऊन तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचेकडून दिव्यांगांनी तपासणी करून घ्यावी. शिबीरात येतांना आपले अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र आणण्यास विसरू नये हि नम्र विनंती. ज्या बंधु-भगिनींकडे अपंगत्त्वाचे सिव्हील सर्जन यांचे प्रमाणपत्र नसेल अशा सर्वांनी सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. या सर्वांसाठी पुढील महिन्यात पुन्हा शिबीराचे आयोजन करणेत येणार आहे.

LEAVE A REPLY

*