Live Video : जनुकीय बदलापासून निर्यातीच्या पद्धतीपर्यंत; खा. पवारांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

मोहाडी येथील शेतकऱ्यांच्या सह्याद्री फार्मवर शरद पवारांची भेट

0

नाशिक (विशेष प्रतिनिधी) ता. २ : शेतमाल निर्यातीच्या संस्थांच्या कार्यप्रणाली पासून पिकांमधील जनुकीय बदल आणि त्या आधारे भविष्यातील वाढणारे कृषी उत्पादन, तसेच द्राक्षापासून ते कोकणातल्या काजूपर्यंत असा सर्व आढावा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आज शेतकऱ्यांसमोर मांडला.

मोहाडी, ता. दिंडोरी येथे शेतकऱ्यांनी स्थापक केलेल्या कृषी माल आणि प्रक्रिया कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला त्यांनी सकाळी  भेट दिली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले. श्री. पवारांना असलेल्या आधुनिक शेतीच्या अद्ययावत ज्ञानाबद्दल येथील तज्ज्ञ आणि प्रगतीशील शेतकरीही अवाक्‌ झाले.

काय म्हणाले खा. शरद पवार, पाहा लाईव्ह

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आज सकाळी ९ च्या सुमारस मोहाडी गावात आगमन झाले.

त्यानंतर ते जवळच असलेल्या सह्याद्री फार्म येथे पोहोचून तेथील शेती आणि शेतीच्या प्रयोगांची पाहणी करून माहिती घेत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. पवार हे या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून मोहाडी आणि जानोरी परिसरातील शेतकऱ्यानीं वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता सुजलाम सुफलाम बनला  आहे.

सह्याद्री फार्मच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी कुठल्याही दलाल आणि व्यापाऱ्यांशिवाय स्वत:च शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग सुरू केले असून देशातील इतर शेतकऱ्यांसाठी शेतीचे हे स्वयंपूर्ण मॉडेल आदर्शवत ठरत आहेत.

 

LEAVE A REPLY

*