शेतकऱ्यांच्या कंपन्यांचा जीएसटी कमी करावा; पवारांपुढे शेतकऱ्यांची कैफियत

0

नाशिक : (दिनेश सोनवणे/प्रसाद जगताप),  ता. २ : रिलायन्सप्रमाणेच शेतकऱ्यांच्या लहान फामर्स प्रोड्युसर कंपन्यांना सारखाच जीएसटी द्यावा लागतो. तो सरकारने कमी करायला हवा.

तसेच शेतकरी कंपन्यांचा व्यापार वाढीस लागायचा असेल, तर त्यांना सवलती द्यायाला हव्यात अशा मागण्या शेतकरी प्रतिनिधींनी यावेळी मांडल्या.

मोहाडी, ता. दिंडोरी जवळ शेतकऱ्यांच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आणि मागण्या यावेळी मांडल्या.

युवामित्र  कंपनी, सिन्नर येथील शेतकरी उद्योजक सुनील पोटे यांनी सांगितले की भांडवल उभारणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे, त्यासाठी रिस्कफंड उपलब्ध व्हायला हवे. ‘इमा’च्या धर्तीवर काम व्हायला हवे.

प्रसिद्ध फळबागा तज्ज्ञ डॉ. भगवान कापसे यांनीही आपले मत मांडले.

शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, आठवडे बाजार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायला हवेत. असे मत मधुकर कांगणे यांनी मांडले.

फार्म प्रोड्युसर कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे मार्केटिंग करण्याचे काम केले पाहिजे, जेणे करून शेतकऱ्याला थेट मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी माल विकता येईल असे मत शेतकरी रामदास पाटील यांनी मांडले. शेतकरी चांगला माल पिकवतो पण मार्केटिंग होत नसल्याने त्याला भाव मिळत नसल्याचे निरीक्षण जामनेरचे शेतकरी गोकुळ पाटील यांनी मांडले.

शेतकऱ्यांसाठी बँकांचे व्याजदर कमी करायला हवे असे मत जुन्नर येथील अजय दिंडोरकर यांनी मांडले, तर शेतकऱ्यांना महामार्गालगत जागा मिळावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*