सातपूर परिसरात औषध फवारणी अभावी डेंग्यूसह साथींच्या आजारांत वाढ

0

सातपूर । दि.3 प्रतिनिधी
नाशिक महापालिकच्या हद्दीत डासांचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागातर्पे पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदाराकडून योग्य प्रमाणात फवारणी केली जात नसल्याने डासांची पैदास मोठठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

सातपूर विभागात नासर्ही नदीतून वाहणारे पाणी दूषीत व नाल्याचे असल्याने यात घाण मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी अनेक भागात पाणी साठून राहत असल्याने डासांचा प्रादुचर्भाव वाढल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडून फवारणीचा ठेका दिलेला असतानाही योग्य पध्दतीने आ;षध फवारणी केली जात नसल्याने नागरीकांना साथीच्या आजारांचा त्रास वाढू लालेला आहे. त्यातून सातपूर परिसरात डेंग्यू आजाराच्या रूग्णांत मोठी वाढ झाली असून, नागरीकांच्या जीवनाशी हा खेळ होत असल्याची तक्रार नागरीक करीत आहेत.

मनपाच्या अटी-शर्थीनुसार काम न करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी मनसे गटनेता सलीम शेख यांनी पत्राव्दारे मनपा आयुक्तांकडे केलेली आहे.

आरोग्य विभागामार्फत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावर लाखो रूपये खर्च केले जात आहेत.मात्र, ठेकेदाराकडून पाहिजे त्या प्रमाणात फवारणी केली जात नाही. सातपूर विभागात तर ठेकेदाराचे कर्मचारी कधीच आढळून येत नाही.

सातपूरमधील डेंग्यूसदृश आजाराच्या रूग्णांची संख्या बघता अस्वच्छतेच्या ठिकाणी व पाण्याची साठवणूक होणार्‍या ठिकाणी पेस्ट कंट्रोलची फवारणी तातडीने करण्यात यावी, कामचुकार ठेकेदारांचा ठेका रद्द करावा, व सातपूर परिसर डास मुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*