संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिकनगरीत आगमन

0

नाशिक, ता. १० : त्र्यंबकेश्वर येथून काल प्रस्थान ठेवल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी नाशिक नगरीत आगमन झाले.

काल रात्री पालखीचा मुक्काम सातपूर येथे होता. आज सकाळी सातपूरहून पालखीने नाशिक शहरात प्रस्थान ठेवले.

रविवार कारंजा, अशोक स्तंभ परिसरात पालखीच्या स्वागतासाठी सुबक रांगोळ्या चितारण्यात आल्या.

परंपरेप्रमाणे आज जुन्या नाशकातील संत नामदेव मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर पालखी पुढील वारीसाठी प्रस्थान ठेवेल.

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत  उपमहापौर प्रथमेश गिते व पदाधिकारी अधिकारी यांचे हस्ते झाले

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचे स्वागत तरण तलाव येथे करण्यात आले.

या कार्यक्रमात सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली मनपा तर्फे या 35 दिंडी प्रमुखाना चारजर बॅटरी भेट वस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, उपमहापौर प्रथमेश गीते,गटनेते गजानन शेलार,दिक्षा लोंढे,प्रभाग सभापती हेमलता पाटील, नगर सेवक गुरमित बग्गा,नगरसेविका प्रियंका घाटे,माजी नगरसेवक तानाजी जायभावे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम,संजय महाराज धोंडगे,पंडित महाराज कोल्हे,मोहन महाराज बेलापुरकर, महाराज लहवीतकर, डॉ धनश्री हरदास,अण्णा साहेब महाराज आहेर,आर.पी.आय. नेता किशोर घाटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले,हिरामण जगझाप,नितीन गंभीरे,गोपीनाथ हिवाळे,जयश्री गांगुर्डे, लता पाटील,सुकलाल पवार, हुसेन पठाण,विरसिंग कामे,बंडोपंत गोवर्धनेआदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

*