‘ईद-उल-फित्र’ च्या तयारीला वेग; नमाजसाठी ईदगाहवर तयारी

0

जुने नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
पवित्र रमजानुल मुबारक महिन्याचे शेवटचे काही रोजे बाकी राहिले असून मुस्लिम बांधवांनी पवित्र ‘ईद-उल-फित्र’ ची तयारीला वेग दिला आहे.

यासाठी रोज बाजारात गर्दी उसळत आहे. तर दुसरीकडे ईदची सामुदायीक नमाज पठण करण्यात येणार्‍या शाहजानी ईदगाह मैदानावर देखील तयारी जोरात सुरू आहे.

26 जून (सोमवारी) रोजी ईद साजरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मुस्लिम बांधवांनी तयारी सुरू केली आहे. ईदला नवीन कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात रोज मुस्लिम परिवार गर्दी करीत आहे.

ईदच्या खरेदीमुळे शहरातील मुख्य बाजारापेठ असलेल्या मेनरोड, शिवाजी रोड, शालिमार, भद्रकाली आदी बाजारपेठ फुल्ल होत आहे.

पवित्र रमजान महिन्याचे आता शेवटचे सुमारे 6 रोजे बाकी राहिले आहे. यानंतर चंद्रदर्शन झाल्यावर ईद साजरी होणार आहे.

ईदच्या दिवशी सकाळी शहरपरीसरातील मुस्लिम बांधव शाहजानी ईदगाह मैदानावर नमाज पठण करतात. याची तयारी देखील जोमात सुरू आहे.

गोल्फ क्बल ईदगाह मैदानावरील शाहजानी मशिदला रंगरंगोटी करण्याचे काम जवळपास पुर्ण झाले आहे.

यंदा यावर ‘पवित्र कलाम शरीफ’ लिहीण्यात आले आहे. त्यात प्रमाणे पावसामुळे खराब झालेल्या मैदानावर सपाटीकरण करण्याचे काम देखील होत आहे.

LEAVE A REPLY

*