नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरला जोरदार पाऊस

0

नाशिक/ त्र्यंबकेश्वर, ता. ६ : नाशिक शहर परिसरासह आज त्र्यंबकेश्वर भागात दुपारी २ ते ३च्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

शहरातील नाशिकरोड, सातपूर, द्वारका परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते.

त्र्यंबकेश्वरलाही पावसाने हजेरी लावली. येथे आज दुपारी तीनच्या सुमारास अंधारून आले आणि वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडला. भात पिक कापणीस आले असताना पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान हवामान अभ्यासक किरणकुमारे जोहरे यांनी देशदूतला सांगितले की हा परतीचा मॉन्सून असून या महिन्यात केव्हाही तो अचानक पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या, तसेच काढलेल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*