पेठच्या नगरपंचायतीत मुख्याधिकारी व पदाधिकारी वाद विकोपास 

0

पेठ (प्रतिनिधी) ता. १४ : पेठ -दि .१३  नगरपंचायत अस्तित्वात येऊन ३ वर्षाचा कार्यकाल होत नाहीत तोच प्रशासन व पदाधिकारी यांच्यात विकास कामांवरून, तसेच मानपानाच्या मुद्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झाला आहे.

पेठ नगरपंचायतीत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्षा, उपनगरध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून विकासकामात प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याच्या मुदयावरून सर्वसाधारण सभेत ठराव क्र .१३७ नुसार मुख्याधिकारी यांना पेठ नगरपंचायतीतून कार्यमुक्त करून नवीन मुख्याधिकारी मिळणेबाबत ठराव करण्यात आला.

एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासाठी एकी दाखविली असली तरी अतिक्रमण काढण्यासह इतर विकासकामांबाबत तीन वर्षात काहीच पाऊल उचलले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

LEAVE A REPLY

*