सेवाकुंज हल्ल्याप्रकरणी कुख्यात गुंड चोथवेला देशी पिस्तुलांसह अटक

0

नाशिक (प्रतिनिधी) : समीर हांडे खूनाच्या केसमध्ये जन्मठेप झालेला आणि न्यायालयाच्या अटी व शर्तीवर तुरुंगाबाहेर असलेल्या कुख्यात गुन्हेगार तुकाराम चोथवे याला २९ सप्टेंबर रोजी सेवाकुंज केलेल्या अविनाश चौलकर हल्ल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी काल रात्री सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे आणि स्विफ्ट डिझायर कार असा  पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काल रात्री आरोपी तुकाराम चोथवे हा मखमलाबाद  ते रामवाडीकडे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी  सपोनि कुलकर्णी, उपोनि इंगोले, पोहवा बस्ते,  पोना चव्हाण, म्हसदे, रायते वसावे यांनी घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच तो कार सोडून पळून जाऊ लागला, तेव्हा पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले.

सध्या चोथवे हा उच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींवर जामिनावर सुटलेला असून त्याचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च  न्यायालयात अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दिनांक २९ सप्टेंबर रोजी सेवाकुंज मारूती ते श्रीराम विद्यालयादरम्यान  अविनाश कौलवर व त्याचे मित्र चालत जात असताना चिंचेच्या झाडाजवळ नाग्या, झगड्या, तुकाराम चोथवे, निलेश नेरुळकर व त्यांच्या इतर साथीदारांनी हत्यारांसह त्यांच्या हल्ला केला व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.  या प्रकरणी गुन्हा दाखल होता. घटनेनंतर चोथकर फरार होता.

LEAVE A REPLY

*