पंचवटीत म्हशींच्या गोठ्याआड चालायचा अनैतिक व्यवसाय; पोलिसांचा छापा

0

पंचवटी (प्रतिनिधी) ता. २३ : पंचवटीत लिंकरोड परिसरात म्हशीच्या गोठ्याच्या आडून चालणारा अनैतिक व्यवसाय सुरू आज सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला.

अनैतिक व्यवसाय चालविणारा संतोष कारभारी खैरे (४२) रा.अमृतधाम आणि अल्फासमिया उर्फ राजू राहणार (आसाम )यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.

बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंद वाघ , सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले आदींनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*