Video : असा झाला आपल्या पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १ : आज पंचवटी एक्सप्रेसचे एखाद्या महाराणीप्रमाणे नाशिक रेल्वे स्थानकात डौलात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात नाशिककर प्रवाशांनी तिचे स्वागत केले.

वातावरणात उत्साह आणि भारावलेपण दोन्हीही होते. अनेकांनी नोकरीत असताना आपल्या आयुष्याचा कितीतरी काळ  याच पंचवटीत व्यतित केलेला. अनेकांच्या सुखदु:खाची तीच साथीदार आणि साक्षीदार राहिली आहे.

अनेकांची स्वप्न याच गाडीत फुलली आणि फळासही आले. अनेकांचे संसारही याच गाडीच्या साक्षीने सुरू झालेले आहेत. नोकरदार आणि व्यावसायिकांच्या जवळपास तीन पिढ्या याच गाडीतून मुंबई नाशिक मुंबई प्रवास करत आल्या आहेत.

त्यामुळे या सर्वांची तिच्यासोबत वेगळी भावनिक गुंतवणूक आहे. त्यामुळेच आजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम तिला खास ४२ व्या वाढदिवसानिमित्त बनविण्यात आलेला फलक लावण्यात आला. नंतर फुलांनी सजविण्यात आले. अनेकांनी तिच्या सोबत सेल्फीही काढून घेतले. फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठीही चढाओढ लागली होती.

खासदार, आमदार यांच्यासह प्रवाशांनी केक तयार ठेवला होताच. हा केक कापून सर्वांचे तोंड गोड केले. पंचवटीचे लोकोपायलट आणि गार्डचाही आवर्जून सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली.

LEAVE A REPLY

*