गौरी पटांगणातील सराईत गुंडाचा रुग्णालयात मृत्यू; खूनाची चर्चा

0

नाशिक, ता. १२ : काल रात्री आठच्या दरम्यान नागरिकांनी केलेल्या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल केलेल्या मोहन वसंत माळी ऊर्फ मँगो काळ्या (२९, रा. गौरी पटांगण, पंचवटी) याचा आज रुग्णालयात मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालानुसार मारहाणीने नव्हे, तर दारूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजत असून पोलिस खूनासह दोन्ही शक्यता तपासून पाहत आहेत.

त्याच्यावर जबरी चोरी, लूटमार असे गंभीर गुन्हे दाखल होते. काल रात्री आठच्या सुमारास त्याने दारू पिऊन टाळकुटेश्वर पुलाजवळ धिंगाणा घातला आणि नागरिकांना शिवीगाळ केली.

त्यानंतर नागरिकांनी त्याला मारहाण केली.  तसेच १०८ वर रुग्णवाहिकेला फोन करून त्याला जिल्हा रुग्णालयात भर्ती केले.

दरम्यान अतिदारू प्यायल्याने त्याला उलटी होऊन ती श्वासात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.

या पंचवटी पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*