जिल्हाभर अवकाळी पाऊस; द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त कांद्याचेही नुकसान

0

नाशिक (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून) ता. ५ :

नाशिक शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून द्राक्ष, कांदा उत्पादकांपुढे पाऊसामुळे पिक खराब होण्याची समस्या आहे.‍

ढगाळ वातावरणाचा फटका संवेदनशील द्राक्ष शेतीला बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा  फवारणीला सामोरे जावे लागणार असून आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

खेडगाव

खेडगाव परिसरात पावसाचा जोर वाढला, परिपक्व होत असलेल्या द्राक्षबागेत मण्यांवर तडे जाण्याची भीती असून उशीरा छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये डाऊनी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागेत घडकूज होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिंडोरी

संपूर्ण दिंडोरी तालुक्यातच आज पाऊस पडत आहे. दिंडोरी, खेडगाव, वणी, नांदुरी, पांडाणे, वनारे, सापुतारा परिसरात जोरदार पाऊस  झाला.

त्र्यंबकेश्वरसह, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे परिसरात पाऊस पडला. त्यामुळे खळ्यावर असलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला होता.

पावसाचा फटका नाशिकच्या पश्चिम पट्टयासह बागलाणलाही बसला आहे.

सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा परिसरात आज पहाटे पासून पावसाला सुरवात झाली आहे. घाटमाथ्यावर प्रमुख पिके म्हणजे, नागली, वरई,भात उडीद, सोयाबीन इत्यादी पिके खळ्या्वर साठवून ठेवल्याने ती पिके भिजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा संभव आहे. सुरगाणा परिसरासह सापुतारा परिसरात सकाळपासून दाट धुके पहायला मिळाले.

सुरगाणा येथील पाऊस

नांदुरी व सप्तश्रृंगगड भागात पाऊस सुरू झाल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांचे हाल झाले. या परिसरातही ढगाळ वातावरण आणि धुक्याचा वेढा आहे.

LEAVE A REPLY

*