ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रभाकरपंत ओझरकर यांचे निधन

0

देवळाली, ता. ७ : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रभाकरपंत ओझरकर यांचे आज सकाळी ९.३० च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे असून अविवाहित होते.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ते 22 वर्ष  उपाध्यक्ष होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव आदिक, विठ्ठलराव गाडगीळ,  शिवाजीराव देशमुख, जनरल माणेकशा, शिवराज पाटील, विनायदादा पाटील, गोपाळराव गुळवे यांचे समवेत त्यांनी पक्षाचे काम केले होते.

देवळालीतील हॉस्पिटल, फुटपाथ, पाणी योजना, मार्केट, शाळा आदि सुविधा उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ते अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात बंधू, भगिनी, पुतणे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*