महापालिका एलबीटी न भरणार्‍या कंपन्यांना काढणार नोटीसा

0

नाशिक । दि.27 प्रतिनिधी
राज्यातील महापालिकेत गेल्या 1 जुलैपासुन जकात, एलबीटी रद्द होऊन त्या जागी जीएसटी लागु झाला आहे. या निर्णयामुळे नाशिक महापालिकेतील एलबीटी रद्द झाला असला तरी जुन महिन्यातील एलबीटीचा संपुर्ण भरणा 20 जुलैपर्यत करणे बंधनकारक होते.

तरीही काही कंपन्यांनी एलबीटी न भरल्याने त्यांना महापालिकेकडुन नोटीसा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. दरम्यान जुन महिन्यातील आजपर्यत 17 कोटी रुपयांचा एलबीटी महापालिकेत जमा झाला आहे.

नाशिक महापालिकेच्यां एलबीटी विभागाकडुन अंशत: एलबीटी वसुलीचे काम हे 31 जुन 2017 पर्यत सुरू होते. यात शहरातील सुमारे 99 लहान मोठ्या कंपन्या व उद्योगाकडुन एलबीटी वसुल केला जात होता.

मात्र 1 जुलैपासुन जीएसटी लागु झाल्याने एलबीटी रद्द झाला आहे. महापालिकेकडुन दर महिन्याचा एलबीटीचा भरणा करण्यासाठी पुढील महिन्याच्या 20 तारखेपर्यत मुदत देण्यात आली होती.

त्यानुसार महापालिकेच्या एलबीटी विभागाला या मुदतीत वसुली होत होती. गेल्या जुन महिन्याचा एलबीटीचा भरणा हा 20 जुलैपर्यत भरता येणार होता. त्यानुसार महापालिकेला केवळ 17 कोटींचा भरणाच मिळाला आहे.

आता जुन महिन्याचा एलबीटी न भरणार्‍या कंपन्यांना महापालिकेकडुन नोटीसा काढण्यात येणार असुन त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. यापुढे जुन महिन्याचा एलबीटी न भरणार्‍या कंपन्यांना दिवसाप्रमाणे व्याज लागणार असुन या व्याजासह हा एलबीटी भरावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*