Gallery : नाशिकसह जिल्ह्यात जोरदार पाऊस

0

नाशिक, ता. १४ : नाशिकसह आज जिल्हयात जोरदार पाऊस पडला. नाशिक शहरात पावणेपाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

नवीन नाशिक व इंदिरानगर मध्येही मुसळधार पाऊस…वीजेचा लपंडाव सुरू..

पावसामुळे नाशिक जिल्हा न्यायालयात झाड कोसळून एक लहान मुलगा जखमी झाला.

वणी, वडाळीभोई, मनमाड, निफाड, सटाणासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक परिसरातही पाऊस झाला आहे.

वणी आणि वडाळीभोई येथे पावसाचा चांगला जोर होता.

निफाड आणि मनमाड येथेही जोरदार पाऊस पडला.

मनमाड शहरात आज दुपारी सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली.

तसेच निफाड शहरासह तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू असल्याचे समजते.

या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या मशागत व पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

सटाणा, वडाळी परिसरात पाऊस असताना शेजारील देवळ्यात पावसाने हुलकावणी दिली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत नाशिक शहरात १६ मि.मी. पाऊस झाला.

(व्हिडिओ : बब्बू शेख, मनमाड,

LEAVE A REPLY

*