राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अनिता भामरे; तर कार्याध्यक्षपदी सुषमा पगारे

0

नाशिक, ता. ४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नासिक महिला शहराध्यक्ष पदी अनिता महेश भामरे यांची, तर कार्याध्यक्ष पदी सुषमा पगारे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा ताई वाघ यांनी प्रदेश कार्यालयात मुंबई येथे घोषणा केली.

या निवडीचे स्वागत पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राज्य अध्यक्ष सुनील तटकरे, प्रभारी जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे,  आमदार दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार संजय चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, प्रदेश चिटणीस नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, मुख्तार शेख,  जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शोभा साबळे, समिना मेमन, गजानन शेलार, राजेंद्र महाले, सुफी जीन, दिलीप खैरे, आनंद सोनवणे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, यांनी अभिनंदन केले आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सांगितलेले ध्येय धोरणे राबवून समाजातील दीन दुबळ्या महिलांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी ह्या शहराध्यक्ष पदाचा उपयोग करेन. त्याच प्रमाणे महिलांचे संघटन वाढवून पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत महिला बरोबरीने काम करतील, अशी भावना यावेळी अनिता भामरे यांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

*