नमिता कोहोक यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार

‘नॅशनल अ‍ॅचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर यंग आंत्रेप्रेन्युअर’ने सन्मानित

0

नाशिक । दि.28  प्रतिनिधी – गेल्या फेब्रुवारीत ‘इंडिया इंटरनॅशनल वुमेन ऑफ दि मिलेनियम’ पुरस्कार प्राप्त करून नाशिकची मान जगभर उंचावणार्‍या नमिता कोहोक यांना वर्षभरात तिसर्‍यांदा प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या भव्य सोहळ्यात नमिता कोहोक यांना ‘यंग माईंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ नामक संस्थेद्वारा ‘नॅशनल अ‍ॅचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर यंग आंत्रेप्रेन्युअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘ग्लोबलायझशेन ऑफ इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल डेव्हलपमेंट’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रप्रसंगी कोहोक यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.

याप्रसंगी भाजपचे महामंत्री तीर्थसिंग रावत, पद्मश्री जसपाल राणा, माजी मंत्री रामकुमार वालिया आदी उपस्थित होते. या पुरस्कार प्राप्तीने आपण भारावल्याची प्रतिक्रिया नमिता कोहोक यांनी उपस्थितांशी संवादप्रसंगी व्यक्त केली.

यावर्षी ‘इंडिया इंटरनॅशनल वुमेन ऑफ दि मिलेनियम’ पुरस्कार मिळाल्यानंतर कोहोक यांना गेल्या मे महिन्यात ‘डायमंड ऑफ एशिया इंटरनॅशनल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गेल्या वर्षभरात तिसरा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून कोहोक यांनी नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

LEAVE A REPLY

*