कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई नाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविले

0

जुने नाशिक (प्रतिनिधी) ता. १६ : सुनावणीसाठी स्थगिती असलेल्या आणि नंतर काल न्यायालयाने याचिका फेटाळून लावलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आज अखेर मनपाने कारवाई केली.

आज सकाळी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह मुंबई नाका ते प्रकाश पेट्रोलपंप रस्त्यावर असलेले धार्मिक स्थळ हटविण्यात आले.

यावेळी नागरिकांनी विरोध केल्यानंतर थोडा तणाव निर्माण झाला होता. संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिस चौकीचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

यानंतर भारतनगर पखाल रोड आणि भाभानगर परिसरात कारवाई होणार आहे.

दरम्यान काल कोर्टाच्या आदेशाने न्यायालयात गेलेल्या ७ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या हटविण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यातील एकावर आज कारवाई झाली. लवकरच उर्वरित अनधिकृत स्थळे हटविण्यात येणार आहेत.

अखेर ‘ती’ सात धार्मिक स्थळे पाडणार; न्यायालयाने याचिका फेटाळली

LEAVE A REPLY

*