नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून १४ जूनदरम्यान

0

देशदूत डिजिटल

नाशिक, ता. ९ : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन १४ जून रोजी होणार असून गेल्या ४८ तासांत नाशिक व धुळे परिसरात झालेला मृग नक्षत्राचा पाऊस हा पूर्व हंगामी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनच्या पावसाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात यायला आणखी ५ दिवसांचा कालावधी आहे.

या संदर्भात देशदूत डिजिटलला माहिती देताना हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की पूर्व हंगामी पाऊसात ढगांचा मोठा आवाज होऊन वीजेचा गडगडात होतो. तर मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण आभाळ काळ्या ढगांनी व्यापले जाते. सध्या तसे होताना दिसत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीचा विचार करताना मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*