वडाळागावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणास अटक

0

इंदिरानगर (प्रतिनिधी):- लग्नाचे आमिष दाखवून वडाळागावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरोधात  इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणास इंदिरानगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वडाळा गावातील एका चौदा वर्षीय मुलीला डिसेंबर २०१६ पासून लग्नाचे आमिष दाखवून हसन नवाज शाह (२७, रा. वडाळागाव) या युवकाने बलात्कार केला.

संबंधित मुलीने लग्नाची विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ केल्याने मुलीच्या फिर्यादीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या युवकास पोलीसांनी आज अटक केली असून त्याच्यावर भादवि कलम 376 व बाल बाललैंगिकअत्याचार कायदा कलम 4 व 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*