मनमाडला कंटेनर दुकानांत घुसला, जीवितहानी नाही

0

मनमाड(प्रतिनिधी)-मोठ मोठे गर्डर घेऊन जाणारा कंटेनर रस्त्याला खेटून असलेल्या दुकानामध्ये घुसल्याची घटना मनमाड शहरातील कैम्प भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली.

ब्रेक निकामी झाल्याने वाहनचालकाचा वाहनावरून ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला.

सुमारे १० भाजीपाला व इतर वस्तूच्या दुकानी उध्वस्त करत हा कंटेनर रस्त्याच्या वाजूला असलेल्या इमारती पासून अवघ्या ५ फुटावर जावून थांबला.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला जर हा कंटेनर इमारतीत घुसला असता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती नसीब बलवत्तर होते त्यामुळे इमारतीतील लोकांचे आणि त्यांच्या बरोबर रात्रीची वेळ असल्याने दुकाना कोणीही नव्हते.

त्यामुळे त्यांचे ही प्राण वाचले.अपघातामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एकेरी वाहतूक सुरु केली.आज सकाळी दोन क्रेन आणून हा कंटेनर अपघातस्थळावरून हटविण्यात आला आहे

या बाबत अधिक वृत्त असे कि तब्बल २४ टायर असलेला कंटेनर मोठे गर्डर घेरून धुळ्याकडे जात असताना मनमाडच्या कैम्प भागात त्याचे ब्रेक निकामी झाल्याने वाहन चालकाचा गाडी वरून नियत्रण सुटल्यानंतर कंटेनर रस्त्याला खेटून असलेल्या सुमारे १० दुकानाना(टपऱ्या) तुडवत एका खड्ड्यात जाऊन थांबला.

ज्या ठिकाणी कंटेनर थांबला होत्या तेथून अवघ्या ५ फुटांच्या अंतरावर तीन इमारती असून त्यात  दूरसंचार केंद्र,आयल कंपनी,रेल्वे आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी राहतात.नशीब बलवत्तर होते म्हणून या सर्वांचा थोडक्यात जीव वाचला.

शिवाय कंटेनर ने ज्या दुकानी उध्वस्त केल्या त्या रात्र असल्याने बंद होत्या त्यामुळे सुदैवाने त्यांचे देखील प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.या अपघातामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एकेरी वाहतूक सुरु केली आज सकाळी दोन क्रेन आणून हा क्रेन हटविण्यात आला.पोलिसांनी क्रेन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

*