मालगव्हाणला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

0

मनखेड (प्रतिनिधी) ता. २ : सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा मालगव्हाण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची गांधीजीच्या जीवनावर आधारित भाषणे  केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मार्गदर्शन करतान म्हणाल्या की महात्मा गांधी हे एक आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेले. आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.  देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्राबद्दलही त्यांनी माहिती दिली.

त्यानंतर शाळेचे उप-शिक्षक मोहन धूम यांनी लाल बहादुर शास्री यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शनपर भाषण केले. या प्रसंगी उपस्थित शाळेचे शिक्षक एस पी चौधरी,  कमलेश भोये, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*