महाऑनलाईनचा सावळा गोंधळ सुरूच; नागरीक मेटाकुटीस

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
दाखल्यांची समस्या काही केल्या सुटत नसून,मुंबईतील महा-ऑनलाईनचे अधिकारी नाशकात आल्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही.

महाऑनलाईच्या सर्व्हमुळे अधिकारी, नागरीक आणि सेतूचालकही मेटाकुटीस आले आहे. प्रवेशाचा अंतिम टप्पा असूनही दाखले मिळत नसल्याने आता नागरीक अधिकारयांच्या दालनात गर्दी करू लागले आहे.
गत महिनाभरापासून संथ असलेल्या महा-ऑनलईनचे सर्व्हर अद्यापही डाऊनच आहे.

यामुळे शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रीया सुरु झाल्यापासून दाखल्यांच्या वितरणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दूसरीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी धावपळ सुरु असून ऑनलाईन अर्ज सादरीकरणाची प्रक्रीया असल्याने तेथेही दाखल्यासाठीच्या रकान्यात जोपर्यंत माहीती सादर केली जात नाही तोपर्यंत अर्जही स्विकारले जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांना दाखल्यांभावी वेळ असतानाही प्रवेशासाठी अर्ज भरण्यास विलंब होत आहे.

तर शासनाने सर्व प्रकारच्या सेवांसाठी एकच महा-ऑनलाईनचे पोर्टल तयार केल्याने त्यावरच सर्व 372 सेवांचे अर्ज येत असल्याने ही सर्व सिस्टीमच संथ आहे.

त्याचा परिणाम शैक्षणिक दाखल्यांवर होत असून विद्यार्थ्यांकडून आता कमीत कमी शैक्षणिक दाखल्यांसाठी स्वंतत्र सर्व्हर, पोर्टल आणि स्वतंत्र यंत्रणेचीच व्यवस्था करण्याचीही मागणी होत आहे. दरम्यान नुकतेच मुंबईतील महाऑलाईनचे सिटीजन हेड नाशिकलाही येऊन गेले. त्यांनीही ही समस्या सोडविण्यासाठी वाढीव जॉब सर्व्हरची व्यवस्था करण्याचे अश्वासन दिले परंतु यावर अद्याप कोणताही तोडगा निघू न शकल्याने जिल्हयात ऑनलाईन दाखले वितरणाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

रेशन कार्डचे सर्व्हरही ठप्प
रेशनकार्डसाठीही ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची सुविधा आहे. परंतु त्यासाठी खासगी सॉफ्टवेअरचा वापर जिल्हा पुरवठा विभागाकडून केला जात आहे. महा-ऑनलाईनच्या पोर्टलवरुनच त्याचे वितर्‍ण होणे आवश्यक असतानाही खासगी सॉफ्टवेअरचा आग्रह पुरवठा विभागाकडून का धरला जात आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. तर हे खासगी सॉफ्टवेअरही 7 दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने नागरीकांना रेशनकार्डच मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

*