जानोरी धान्य साठा प्रकरणी संशयाची सुई पोलिसांवर?

0

जानोरी ( वार्ताहर) – दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील धान्यसाठा प्रकरण अवघ्या जिल्ह्यात एक चर्चेचा विषय ठरला असून यातील सत्यता बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरीही संबंधित प्रकरणात पोलीस यंत्रणेलाच संशयास्पद बघत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने कुणाच्या चुकीचे खापर कुणाच्या माथी… असे चित्र बघावयास मिळत आहे.

धान्य घोटाळ्यातील टोळ्यांना एकास उघडकीस आणण्यासाठी तर दुसरीकडे वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप करून पोलीसांनाच या टोळ्यांमध्ये विभाजन करून एक लाजिरवाणे आरोप होत असल्याची चर्चा आहे.

१७ नोव्हेंबर रोजी रात्री जानोरी येथील गट नंबर ५९१/२ मधील आशापुरा गोडावुनच्या गाळा क्रमांक २८ मधील धान्य गुदामावर रेशनचे धान्य असल्याचे संशयावरून गुदामातील धान्य जप्त करण्याबाबत कारवाई करण्यात आली.नाशिक ग्रामीणचे  कैलास ठाकुर नामक पोलिस या प्रकरणात रेशनच्या धान्य घोटाळ्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीलाच सोबत घेऊन आल्याने आणि संबंधित गुदाम मालक हा त्या मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या गुन्ह्यात महत्त्वाचा साक्षीदार असल्याचे निदर्शनास आले असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

रेशन धान्य घोटाळ्यातील दोन टोळ्यांना पोलीस मदत करीत असल्याचे सांगून पोलीसांनाच दोन्ही बाजूंच्या धान्य घोटाळ्यातील टोळ्यांना विभाजन करून देण्याचे एक लाजिरवाणे आरोप होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल.

पोलिसांना बघताच सर्व सामान्य माणसाला सुरक्षेची हमी वाटते तर गुन्हेगारांना शिक्षेची भिती निर्माण होते.सर्वसामान्य जनतेसाठी रखवालदार तर गुन्हेगारांना आपला कर्दनकाळ ठरलेल्या पोलीसांना अशा घोटाळेबाज टोळ्यांमध्ये विभाजन केले जात असल्याने जनमानसात एक नैराश्याची भावना व्यक्त होत आहे.

एखादा गुन्हा उघडकीस आणताना इतर संबंधित गुन्हेगारांकडुन माहिती मिळवली जाते व त्या गुन्ह्याचा शोध लावुन त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात यात काही नाविन्य नाही.परंतु गुन्हेगारांना वयक्तिक सोबत घेऊन जावुन आपले वयक्तिक संबंध आपल्या कर्तव्य बजावत असताना वापरणे हे नक्कीच चुकीचे आहे.परंतु एका कर्मचार्याच्या चुकीमुळे अवघ्या पोलीस प्रशासनालाच बदनामीस सामोरे जावे लागत असल्याने हेच खरे दुर्दैव आहे.

पोलीस हा जनतेचा मित्र असतो अशी संकल्पना मांडली जाते. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय… ‌‌” या उक्तीप्रमाणे पोलिस आपले कर्तव्य बजावत असतो. परंतु काही बोटावर मोजण्या इतके कर्मचारी गुन्हेगारांच्या चिरीमिरीत गुंतले जातात आणि सबंध प्रशासनाला आपला वाटेकरी बनवित असेल तर ते नक्कीच घातक आहे.

याबाबत पोलीस अधीक्षकांनीच दोषींवर कारवाई करून आपल्या प्रशासनात वचक निर्माण करणं हे आवश्यक आहे.

अवैध धंद्यांचा कर्दनकाळ म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची ओळख झाली आहे. नवीनच रूजु झाल्यावर त्यांनी प्रथम अवैध धंदे बंद करण्याचा जणुकाही विडाच उचलला. परंतु नविन नविन अस होत असते बघु कीती दिवस  दराडेंचा दरारा असतो असे बोलणारेही भरपूर होते.

परंतु दराडेंनी आपला दरारा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याने बोलणारे देखील अचंबितच झाले आहेत हे वास्तव आहे. पोलिसांच्या वरदहस्त लाभल्यामुळे असे धंदे चालतात त्यामुळे अवैध धंद्याबाबत तक्रार करणे शक्यतो टाळणेच पसंत करणारे सर्व सामान्य लोकही अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढे येवु लागला असल्याने दराडेंच्या निर्णयाला व त्यांच्या योजनेलाच मिळालेले यश समजावे लागेल.

अवैध धंद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या दराडेंनी पोलीस प्रशासनाला सर्व सामान्यांच्या मनात एक आदर्श निर्माण केला आहे.असे असताना या धान्य घोटाळ्यातील टोळ्यांना मदत करीत असल्याचा ठपका पोलीसांवरच येत असल्याने हे एक चिंताजनकच मानावे लागेल.

संबंधित पोलिस कर्मचारी याने हा धान्य साठा उघडकीस आणताना आपल्या विभागातील अधिकारी यांना सोबत घेऊन तसेच स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन कारवाई करणे आवश्यक होते.परंतु तसे काही दिसलेच नाही.उलट धान्य घोटाळ्यातील मोक्का अंतर्गत कारवाई होवून जामिनावर सुटका झालेल्या आरोपीला सोबत घेऊन तो पोलिस एकटाच कारवाई करण्यासाठी गेल्याने यात शंका निर्माण झाली. सुरूवातीला खाजगी कुलूप लावून त्या आरोपीला सोबत घेऊन इतरत्र जातात. स्थानिक पोलीसांनाही यात अंधारातच ठेवण्यात आले हे उघडच आहे.

चोर आल्याचे वृत्त समजुन स्थानिक पोलीस तसेच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमुळे हे प्रकरण उघडकीस आले असे म्हटले तरी ते वावगं ठरणार नाही. दिंडोरी प़ोलीसांनी रीतसर गुन्हा नोंद करून संबंधित गुदाम मालकास अटक केली असून त्यास न्यायालयात हजर करून त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दिंडोरी पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरूवात केली असता पोलीसांच्या तपासावरच शंका घेणे कितपत योग्य आहे.?

पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी या प्रकरणात लक्ष केंद्रित करून पोलिसांवरील जनतेचा विश्वास कायम राहील व भविष्यात या पद्धतीने एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अवघ्या पोलीस प्रशासनाला बदनामीस सामोरे जावे लागेल असे कृत्य घडू नये यासाठी संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करून प्रशासनात वचक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे हे निश्चित.

LEAVE A REPLY

*