नाशिकमधील पेट्रोलपंपांवर आता ग्राहक तपासू शकतील पेट्रोलचे माप

0

नाशिक, ता. २ : पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल कमी मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आता नाशिककर ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी.

शहरातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल-डिझेलचे माप योग्य आहे की नाही याची तपासणी ग्राहकांना करता येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक पेट्रोलपंपांवर ५ लिटरचे माप ठेवण्यात आले असून ज्यांना पेट्रोल किंवा डिझेलच्या मापाबद्दल शंका असेल, ते आता थेट अशी तपासणी करू शकतील.

‘चेक व्हिन’नावाच्या या उपक्रमाला इंडियन ऑईलने त्यांच्या नाशिकरोड येथील पेट्रोलपंपावरून सुरू केला आहे.

यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, कंपनीचे विक्री अधिकारी नितीन चव्हाण, वरिष्ठ प्रबंधक मनीष कुमार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*