Live : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा

0
नाशिक, ता. ९ : आज नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल लागत असून अनेक ठिकाणच्या निवडणूका राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या निकालांकडे लक्ष लागून होते.

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतीतील 1 हजार 647 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तब्बल 627 उमेदवारांची बिनविरोध वर्णी लागल्यानंतर आता 1 हजार 20 जागांसाठी 2 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

सिन्नर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये 22 उमेदवार बिनविरोध झाले असून तेथे आता 229 उमेदवारांचा निकाल आज हळूहळू यायला लागले आहेत. तर पेठमध्ये एका ग्रामपंचायतीसाठी 2 उमेदवार बिनविरोध झाले असून 9 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

निफाडमध्ये 20 ग्रा.पं.मध्ये 57 उमेदवार बिनविरोध झाले असून 389 उमेदवार शिल्लक आहेत. कळवण तालुक्यातील 16 ग्रा.पं.मध्ये 80 उमेदवार बिनविरोध झाले असून 132 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बागलाण तालुक्यातील सर्वाधिक 40 ग्रा.पं.मध्ये 207 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे तालुकावार निकाल पाहण्यासाठी स्क्रोल करा…

सिन्नर

सिन्नरला शहा, कीर्तगळी,  वडगाव-पिंगळा , उजनी, कारवाडी, सायाळे व पाटपिंप्री ग्रामपंचायतींवर माजी आमदार कोकाटे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. या गावांतील थेट सरपंच कोकाटे गटाचे  आहेत.

तसेच ठाणगाव, लोणारवाडी, डूबेरेवाडी, टेंबूरवाडी, नांदूर शिंगोटेत आमदार वाजे समर्थकांची सरशी झाली आहे.

मालेगाव

दाभाडीत राज्यमंत्री दादा भुसेंना हादरा

वजीरखेडे, जातपाडे येथे कमळ फुलले

देवळा

विठेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या परिवर्तन पॅनलच्या भारती विलास पवार यांची निवड

निफाड

पिंपळगाव बसवंत : भास्कर बनकर ( ८२४ मते) पराभूत; अल्पेश पारख( १०३१ मते) विजयी.

ओढा ग्रामपंचायत निवडणुक निकाल : 2017 आपला पॅनल विष्णु (दादा) रामभाऊ पेखळे
विजयी.

शिंगवेत सत्तापरिवर्तन धोंडीराम रायते यांचे विकास पँनल विजयी.

कोटमगाव ग्रा पं वर तुकाराम गांगुर्डेची सत्ता; तुकाराम गांगुर्डे होणार सरपंच

पिंपलस रामाचे तानाजी पुरकर सरपंचपदाचे विजयी उमेदवार.

खडकमाळेगाव : तेजल दत्तात्रय रायते 1781 मतांनी विजयी.

दीक्षित संगीता देविदास चौधरी सरपंच विजयी.

बोकडरे आशा भाऊराव दराडे सरपंच विजयी

येवला : ग्रामपंचयत निकाल

आडगाव चोथवा येथे शिवसेनेच्या खोकले आदमने गटाचा सरपंच

कुसुरला शिवसेनेचे माजी प.स.सदस्य दिलीप मेंगळ यांच्या सरपंचाचा पराभव, दत्ता गायकवाड़ यांच्या प्रयत्नातून संजय गायकवाड़ सरपंच

एरंड़गाव येथे शिवसेनेच्या, मूक बधिर शाळेच्या शिक्षिका मंद पडोळ सरपंचपदी

नायगव्हाणला अपक्ष हिराबाई ढोने सरपंच

चांदगावला अपक्ष संगीता सोनवणे सरपंच

सुरेगाव रास्ता येथे भाजपाचे बाबा डमाळे यांच्या यांच्या पत्नी वंदना डमाळे सरपंच,पैनलही विजयी

इगतपुरी

मुंडेगाव : मनसेनेच्या संगीता भिला हंबीर सरपंचपदी होणार विराजमान.

वासाळी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कोरडे काशिनाथ कचरू विजयी.

 

पेठ :

पेठ तालुक्यातील निरगुडे ग्रामपंचायतीत सरपंचपदासह सहा जागांवर प्रगती पॅनेल. कविता उत्तम महाले सरपंचपदी.

बागलाण :

तांदुळवाडीत थेट सरपंच निवडणुकीत भाजपचे प्रकाश बोरसे विजयी.

 

 

 

LEAVE A REPLY

*