गणेशोत्सवातून अवदानाविषयी जनजागृती

0

नाशिक । दि. 26 प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अवयवदान चळवळ राबविण्यात येत असून गणेशोत्सवाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची संकल्पना मांडली.

त्यानूसार महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्यावतीने श्री गणरायाची स्थापना नाशिक जिल्ह्यातील अवयव दात्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आली.

उंटवाडीरोडवरील संपर्क कार्यालयात गणेश स्थापनेवेळी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, डॉ.भाऊसाहेब मोरे , पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे , भाजपा उपाध्यक्ष आशिष नहार , जगन पाटील , निलेश बोरा , उपअभियंता कुलकर्णी , उद्योजक एम एम पाटील , स्वप्नील बच्छाव , विशेषकार्य अधिकारी संदिप जाधव आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी अवयवदानाचे महत्व जाणून रूग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान होण्याकरीता अभियान हाती घेण्याचे सूचित केले होते.

त्यानूसार वैद्यकिय शिक्षणमंत्री म्हणून महाजन यांनी यावर्षी देखील अवयव दान जागृती साठी येत्या 29 व 30 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयव दान अभियान हाती घेतले आहे. गणपती हे अवयवदानाचे मुळ प्रणेते मानले जातात. अवयवदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे.

अवयवदात्या कुटुंबीयांच्या दातृत्वामुळेच अनेक गरजूंना जिवनदान मिळते. याच प्रेरणेने कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिक शहरातील अवयवदाते भारंबे कुटुंबीय झलके कुटुंबीय व लोणारे कुटुंबीय यांच्या हस्ते पालकमंत्री संपर्क कार्यालयातील गणेश पुजन करून स्थापना करण्यात आली.

यात गंगापुर रोड येथील युवराज व कविता भारंबे यांनी त्यांच्या मुलाचे ,सिन्नर येथील शंकर लोणारे यांनी त्यांच्या पत्नीचे तर जेलरोड येथील विजया झलके यांनी त्यांच्या पतीचे अवयवदान केले. यावेळी सर्वानी अवयवदान अभियानात सामिल होण्याचे आवाहन केले व आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*