दै. देशदूतच्या ‘ज्ञानदूत’ कुपन चिटकवा उपक्रमास उदंड प्रतिसाद

0

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांच्यात वृत्तपत्र वाचनाची सवय रुजवी. त्यांच्यात स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी दैनिक देशदूतच्यावतीने ‘ज्ञानदूत’ कूपन चिटकवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डुबेरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात या उपक्रमास आज (दि.20) पासून सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून पहिल्याच दिवशी 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. टॅब, रेंजर सायकल, इंग्लिश डिक्शनरी स्कूल बॅग,यासह अन्य बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे.

गरीब विद्यार्थांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने 50 तर प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्याकडून 25 असे 75 वृत्तपत्र विद्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या प्राचार्य एस. डी. रहाटळ यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे. यावेळी लोकनेते पतसंस्थेचे चेअरमन त्र्यंबकराव वाजे, जनसंपर्क संचालक अंबादास वाजे, उपसरपंच अनिल वारुंगसे, देशदूतचे वितरण प्रतिनिधी सोमनाथ गडाख, ऍड. प्रदीप वारुंगसे, संजय वाजे, विजय वाजे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

*