बोलठाणचे कपाशी उत्पादक बोंडअळीने हैराण; कृषी विभागाकडून पाहणी

0

बोलठाण (वार्ताहर) ता. २ : बोलठाण व परिसरात मागील महिन्यापासून कपाशी पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

या बाबत कृषी विभाग नांदगाव व तहलसील कार्यालयात निवेदन देऊन या बाबत पंचनामे करावे अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी वर्गाने केली होती त्या अनुषंगाने कृषी विभागा कडून याची प्राथमिक तपासणी करण्यात आली व किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प घेण्यात आला.

या बाबत सविस्तर असे की कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीने परिसरातील शेतकरी हैराण असून असे अलिकडच्या काळात पहिल्यांदाच घडल्याने हे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.

योग्य उपाययोजना सुचत नसल्याने डोळ्यासमोर होत असलेली नुकसान पाहण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही.

या बाबत कृषी विभाग नांदगाव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून किडीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले असले तरी मात्र ही रोग ठराविक जातीच्या कपाशी असल्याचे अधिकारी वर्गा कडून समजते.

परिसरातील शेतकरी वर्गाशी संपर्क केला असता सर्वच कापशी वर बोंड अळी चा हल्ला असून त्या मुळे उत्पन्नात कमालीची घट आल्याचे समजते.

कृषी विभाग ने पहाणी करून प्राथमिक पाहणी करून या बाबत चा अहवाल पुणे येथे पाठवण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवही होईल.

LEAVE A REPLY

*