जिल्हा रूग्णालयातून बॅटर्‍यांची चोरी

0

नाशिक । जिल्हारूग्णालयातील ट्रेनिंगसेंटरमधून इन्व्हटरसाठी वापरण्यात येणार्‍या महागड्या बॅटर्‍या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.28) सकाळी उघडकीस आली.

या प्रकरणी कर्मचारी बाळकृष्ण आहिरे (रा.वृंदावननगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जिल्हारूग्णालय आवारातील आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यालयात ही चोरी झाली.

येथे वीज झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून इनव्हटरचा वापर केला जात होता. त्यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने एक्साईड कंपनीच्या सुमारे 30 हजार रूपये किमतीच्या तीन बॅटर्‍यांची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र चोरट्यांनी तीनही बॅटर्‍या चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

LEAVE A REPLY

*