सिन्नर तालुक्यात कोथिंबीरीला तूरे ; सदोष बियाणांचा आरोप

0

डुबेरे (वार्ताहर) ता. १४ :  डुबेरे ता. सिन्नर येथील शेतकऱ्यांनी मालव कंपनीचे पेरलेले धन्याचे बियाणे सदोष निघाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून कोथंबीरीला तूरे आल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.

प्रदीप एकनाथ कुरणे यांनी 12  किलो  2 बीघे व कैलास बाळाजी वामने यांनी  ६ किलो बियाणे १ बिघा क्षेत्रात टाकले आहे.

मालव कंपनीचे हे बियाणे असून कोथंबीरीला तुरे आले आहे. तसेच कोथंबीरीच्या पिकात पालक व भेंडी उतरली आहे. कोथंबीरीला आलेले तुरे पाहून व्यापारी कोंथिबीर खरेदी करायला नकार देतात.

त्यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे सदर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

स्थानिक दुकानदाराकडून हे बियाणे शेतकऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्याच्या रोषाचा सामना दुकानदाराला करावा लागत आहे. सदर बियाणे निकृष्ट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत कंपनीने भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अन्यथा कंपनीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*