गंजमाळ- सातपूर येथील अनधिकृत धार्मिक स्थळ शांततेत हटविले

0

जुने नाशिक (प्रतिनिधी) ता. १८ : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महामालिकेने गंजमाळ परिसरातील आझादनगर येथे आज सकाळी दहाच्या सुमारास अनधिकृत धार्मिक स्थळ हटविले

स्थानिक नागरिकांनी मनपाच्या अतिक्रमण पथकास सहकार्य केल्याने ही मोहीम शांततेत पार पडली.

रस्ते, पादचारी मार्ग यांना अडथळा ठरणाऱ्या शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम मागील बुधवारपासून सुरू आहे. आज या मोहीमेचा अकरावा दिवस होता.

गंजमाळ व मुंबईनाका परिसरात तीन ठिकाणी कारवाई पूर्ण झाली असून दुपारनंतर सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यास सुरुवात झाली.

सातपूर अंबड लिंक रोड वरील पपया नर्सरी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेले धार्मिक स्थळ न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाने काढले. रिक्षा चालक मालक संघटनेने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली

त्यानंतर पंचवटी येथील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान मुंबई नाका येथील एक झाड पाडल्याने वृक्षप्रेमींत नाराजी आहे.

LEAVE A REPLY

*