नाशिकची अशोका बिल्डकॉन ठरली देशातील सर्वोत्कृष्ट इन्फ्रा कंपनी

0

नाशिक  (प्रतिनिधी) ता. २ :  रस्ते आणि महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा (इन्फ्रा) उभारणारी यंदाची सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून नाशिकच्या अशोका बिल्डकॉन लि.ला प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा ‘डन ॲन्ड ब्रॅडस्ट्रिट अवॉर्ड’’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

मुंबई येथे एका शानदार समारंभात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून कंपनीचे अध्यक्ष अशोक कटारिया, संचालक मिलप भंसाळी, मुख्य कार्यान्वयन अधिकारी दिलीप कोठारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रस्ते, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीत नाशिकच्या अशोका बिल्डकॉनचे नाव देशविदेशात आघाडीवर आहे. देशात अनेक भव्य प्रकल्प त्यांनी उभारलेले आहेत. त्याच कामाचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान झाला.

‘ड्यून ॲन्ड ब्रॅडस्ट्रिट अवॉर्ड’’ पुरस्कार उद्योग जगतातील एक मानाचा पुरस्कार समजला जातो. १९९७ पासून हा पुरस्कार देण्यात येत असतो. त्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट ५०० कंपन्यांमधून आघाडीच्या कंपन्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यंदाचा  हा पुरस्कार सोहळा आज २ नोव्हेंबर रोजी हॉटेल ग्रॅड हयात येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासह डन ॲन्ड ब्रॉडस्ट्रिटचे अध्यक्ष मनिष सिन्हा,  मुख्य उद्योग सल्लागार कौशल संपत उपस्थित होते.

भारतमाला प्रकल्पानुसार केंद्र सरकार एक्स्प्रेस हायवे उभारण्याच्या विचारात असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी सुमारे १२५० अब्ज रुपयाची उभारणी खासगीकरण्याच्या माध्यमातून केंद्र सरकार उभारण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*