बाजार समिती सुनावणीचा सोमवारी निर्णय; बरखास्तीच्या धास्तीने संचालक चिंतातूर

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्ती प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीत आज शेतकर्‍यांसह आणि दोन्ही बाजूच्या वकीलांचा युक्तीवाद  ऐकून घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी उद्या(दि.14)प्रक्रिया होईल, असे निर्देश आज दिले.

जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्याकडे आज झालेल्या सुनावणीला बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे,  उपसभापती संजय तुंगार, संचालक दिलीप थेटे, शंकर धनवटे, संपत सकाळे, रविंद्र भोये, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, प्रभाकर मुळाणे, भाऊसाहेब खांडबहाले, युवराज कोठुळे, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे, शामराव गावित, जगदीश अपसुंदे, प्रविण नागरे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम आदी उपस्थित होते.

बाजार समिती संचालक मंडळाच्यावतीने अ‍ॅड . विलास आंधळे, अ‍ॅड. सोनवणे यांनी बाजू मांडली तर, उपनिबंधकांनी एका शेतकर्‍यालाही सुनावणी दरम्यान म्हणणे मांडण्याची मूभा दिली होती.

यावेळी संचालकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, समितीत शेतकरी हा प्रमुख घटक आहे, त्यामूळे शेतकर्‍यांना बाजू मांडण्याचा हक्क आहे, असे जिल्हाउपनिबंधक निलकंठ करे यांनी यावेळी स्पष्ट केंले.

दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे आदेश देताना जिल्हाउपनिबंधक करे यांनी त्यावेळी उपस्थित राहणार्‍या बाजारसमिती संचालक मंडळाला कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश यावेळी दिले.

LEAVE A REPLY

*